विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठकीत उपाययोजनांवर निर्णय
जिल्हा प्रतिनिधि शमीम आकबानी
नागपूर 31-.  सर्व दुध संकलन केन्द्रानी दुध संकलन सुरुवात करावी असे निर्देस मा. नाना पटोले याची दिले संबंधित निर्देश न पडणाऱ्या दूध संकलन केन्द्रावर  कडक  कारवाई करण्याचा इशारा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष  नानाभाऊ पटोले यांनी नागपूर येथे विभागीय आयुक्त सोबत घेतलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेतला आहे 

या आढावा बैठकीत पालकमंत्री व ऊर्जामंत्री माननीय नितीन राऊत पशुसंवर्धन विकास मंत्री माननीय सुनील केदार मागासवर्गीय विकास मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार मनपा आयुक्त तुकाराम मुंढे विभागीय आयुक्त संजीव कुमार व इतर विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते
           
              याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र राज्याच्या सर्व जनतेला लॉक डाऊन मध्ये सर्वांनी घरीच रहावे व आपली काळजी आपणच घ्यावी असे आव्हान त्यांनी केले तसेच भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून वेळोवेळी त्यांना योग्य निर्देश देत आहेत त्यामुळे जनतेनी घाबरून न जाता फक्त आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी घरीच राहावे व सुरक्षित रहावे असे आव्हान या आढावा बैठकीत प्रसंगी राज्याच्या जनतेला केले आहे
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours