पुणे : कोरोना व्हायरला प्रसार वेगाने होत असल्याने सरकारने पुण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मध्यरात्री 12 पासून पुणे महापालिका हद्दीच्या सर्व सीमा सील करण्यात येत आहेत. त्यामुळे कुणीही सीमा हद्दीच्या बाहेर किंवा आत येऊ शकणार नाही. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने हा कठोर निर्णय घ्यावा लागला असं प्रशासनाने म्हटलं आहे.
पुण्यात आज दिवसभरात ४२ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. आज करोना बाधीत रुग्णाचा पुण्यात मृत्यू झाला नाही. डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण १८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोनाचा संसर्ग झालेले १८ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ११ ससूनमध्ये तर इतर चौघांवर खासगी हॉस्पिटलांमध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.
पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. सतत गर्दी होत असल्याने किरकोळ दुकानदारांच्या आयुष्याचाच आता प्रश्न निर्माण झाल्यामुळे शहरातील कोथरुड, शास्त्रीनगर, वारजे, शिवणे, उत्तमनगर, सिंहगड रस्ता, धायरी, नऱ्हे, दत्तवाडी, दांडेकर पूल, कर्वेनगर, शिवदर्शन या भागातील किरकोळ दुकानदारांनी 21 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान (मंगळवार ते शुक्रवार) दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, गरजवंताला घरपोच सामान दिले जाईल, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.
पुणे मंडळ एकूण: ६३७ (५५)
कोल्हापूर: ३
कोल्हापूर मनपा: ३
सांगली: २६
सांगली मिरज कुपवाड मनपा:१
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ६ (१)
देशातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या वाढत असताना आज राज्यात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. आज कोरोनाने (Covid - 19) मोठ्या संख्येने डोकं वर काढलं आहे. आज राज्यात एका दिवसात तब्बल 552 रुग्णांची संख्या वाढली असून एकूण बाधितांची संख्या 4200 वर पोहोचली आहे. गेल्या अनेक दिवसांमधील ही सर्वात मोठी वाढ आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours