उस्मानाबाद: नेहमी कुठल्या न कुठल्या कारणाने चर्चेत राहणारे तुळजाभवानी देवस्थानचे मुख्य पुजारी व महंत तुकोजीबुवा वाकोजीबुवा यांच्यासह 6 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊनमध्ये वाढदिवसाचे निमित्त साधत केक कापण्यासाठी गर्दी गोळा केल्याचा तुकोजीबुवा वाकोजीबुवा यांच्यावर आरोप आहे. एवढेच नाही तर केक कापतानाचे व्हिडीओ बनवून ते त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. तुकोजीबुवा वाकोजीबुवा यांच्यासह 6 जणांवर कलम 188, 269 व कोविड कायदा 11 अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन असून तो 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. तरी देखील काही लोकांना याचं गांभीर्ण नाही. जमावबंदी असताना गर्दी गोळा करुन वाढदिवस साजरा करत आहेत. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. ते म्हणजे तुळजाभवानी देवस्थानच्या महंतांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत त्यांचा वाढदिवस साजरा केला. एवढे नाही तर त्यांनी त्याचा व्हिडिओ देखील बनवला. आता या कारनाम्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत.

तुकोजीबुवा वाकोजीबुवा यांच्याविरोधात तुळजापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता सर्वसामान्य नागरिक वेळोवेळी नियम मोडतात, अशी ओरड होत असते, आता लोकांना तत्वज्ञान सांगणाऱ्या महंतानीच कायदा मोडला असल्याने तुळजापूर परिसरात एकच चर्चा रंगली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours