मुंबई, 2 एप्रिल: मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. रुग्णांचा आकडा 335 वर पोहोचले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज सरकारने विविध उपाययोजना करत आहेत. डॉक्टर, नर्स यांच्यासोबतच महाराष्ट्र पोलिस रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. मुंबईत खाकी वर्दीत श्रीदर्शन अर्थात देवाचं दर्शन झाले आहे.

पोलिस हेड काँस्टेबल श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे यांनी मुख्यमंत्री कोरोना सहय्यता निधीत 10 हजार रुपयांची मदत केली आहे. खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करुन हेड काँस्टेबल श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे यांचं महाराष्ट्राच्या जनतेतर्फे कौतुक आणि आभार मानले आहे.

काय म्हणाले गृहमंत्री?
दरम्यान, राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. राज्यात आतापर्यंत 16 जणांचा बळी घेतला आहे. त्या एकट्या मुंबईतील सहा जणांचा समावेश आहे. दुसरीकडे मुंबईकरांच्या रक्षणासाठी हजारो पोलिस 24 तास कार्यरत आहेत. काही पोलिस हातावरचं पोट असणाऱ्या गोरगरीबांना जेवण देताना दितत आहेत तर काही पोलिस मुख्यमंत्री कोरोना सहाय्यता निधीला योगदान देत आहेत. मुंबईतील डोंगरी येथूल पोलिस हेड काँस्टेबल श्रीदर्शन डांगरे यांनी 10 हजार रुपयांच आर्थिक योगदान दिलं आहे. श्रीदर्शन डांगरे यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपुर्द केला. यावेळी गृहमंत्र्यांनी कॉंस्टेबल डांगरे यांचं कौतुक आणि आभार मानले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours