नागपूर, 2 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. लोकांनी घरातून बाहेर पडू नये, एकत्र जमू नये, असं आवाहन वारंवार केलं जात आहे. परंतु, असं सांगून सुद्धा लोकं ऐकायला तयार नाही. नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या आवाहनालाही दुसऱ्या दिवशी केराची टोपली दाखवण्यात आली.

राज्यभरात संचारबंदी लागू असल्यामुळे जीवनावश्यक वस्तू, भाजी, फळं विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. सकाळी संचारबंदी शिथील असल्यामुळे सर्वच ठिकाणी लोकं भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहे. काही ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवून Social Distancing चे नियम पाळले जात आहे.

मात्र, नागपूरमध्ये  रेशीमबाग मैदानावर ठोक भाजी बाजारात Social Distancing चा आजही फज्जा उडाला आहे. नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लोकांना केलेल्या आवाहनानंतर दुसऱ्या दिवशीही तुफान गर्दी पाहण्यास मिळाली.

एवढंच नाहीतर कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, कित्येक व्यक्तींनी मास्क न लावताच गर्दी केली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours