मुंबई, 02 एप्रिल : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने देशभरात हाहाकार उडवला आहे. महाराष्ट्रातही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आजही राज्यात 3 नवे रुग्ण आढळून आले आहे. पुण्यात 2 आणि बुलडाण्यात एक रुग्ण आढळला आहे.

आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 338 वर पोहोचली आहे. काल बुधवारपर्यंत ही संख्या 335 वर होती. चिंतेची बाब म्हणजे, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत चालली होती. त्यातच आज आणखी दोन नवे रुग्ण आढळले आहे. तर बुलडाण्यात आणखी एक रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. बुलडाण्यात या आधी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.  आता बुलडाण्यात मृत व्यक्तीसह कोरोनाबाधितांची संख्या 5 वर पोहोचली आहे.

दरम्यान, कोरोनाबाधित सर्वाधिक रुग्ण हे मुंबई आणि महाराष्ट्रात असल्याची माहिती मिळत आहे. त्यापाठोपाठ केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा राज्यांचा समावेश आहे. तीन राज्यांमध्ये 24 तासांत मोठ्या प्रमाणात नवीन केसेस समोर आल्या आहेत. दिल्लीत 53 नवीन जण पॉझिटिव्ह आढळल्यानं इथली संख्या 152 तर महाराष्ट्रात 36 नव्या केसेस आढळल्यानं 338 वर संख्या पोहोचली आहे.

त्यापैकी एकट्या मुंबईतूनच 30 नवीन पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत. मुंबईत तब्बल 5000 जण क्वारंटाइनमध्ये असल्याचं सांगितलं होतं. त्यातच आता सर्वाधिक कोरोना पसरले अशी भीती असलेल्या धारावीत कोरोनाग्रस्त आढळून आल्याने लोकांमध्ये भीती आहे. 24 तासांत मुंबईत कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर देशभरात  बुधवारी संध्याकाळी 437 नवीन नवे कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 1900 झाली असून आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours