रायगड, 29 एप्रिल : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांचे सुपूत्र नविद अंतुले यांचं निधन झालं.   हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांना  मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

वडील बॅ. ए.आर. अंतुले राजकारणात सक्रीय असताना नविद अंतुले हे राजकारणापासून दूर होते. दोन वर्षांपूर्वी आंबेत ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते सक्रीय झाले. स्थानिक जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता.

मागील लोकसभा निवडणुकीत मार्च 2019 मध्ये नविद अंतुले यांनी काँग्रेस ऐवजी थेट शिवसेनेत प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला होता. सेनेत प्रवेश केल्यानंतर नविद यांनी  खासदार सुनिल तटकरे यांच्याविरोधात प्रचारही केला होता. वडिलांच्या कारकिर्दीत नविद यांनी राजकारणात अपेक्षित यश मिळवता आले नाही.

मात्र, त्यांची राजकीय कारकीर्द अल्पायुषी ठरली.

बॅ. अंतुले यांचे गाव असलेल्या म्हसळ्यातील आंबेतमध्ये नविद अंतुले यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या निधनाची बातमी आल्याने आंबेतसह रायगडवासियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours