पुणे, 6 मे: मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागात पोहोचला आहे. कोरोनाने वारजे-माळवाडीतील एका 11 वर्षांच्या मुलाचा बळी घेतला आहे. कोरोनामुळे मृत झाल्याची ही या भागातील पहिलीच घटना आहे तर वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे.
संपर्कातील 34 जणांची तपासणी...
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुलाला काही दिवसांपासून ताप येत होता. त्याच्यावर घरीच उपचार सुरु होता. मात्र, त्याती प्रकृती आणखीच खालावल्याने त्याला पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सोमवारी सकाळी त्याचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र, रात्री उशीरा त्याचा मृत्यू झाला. या मुलाच्या संपर्कातील 34 जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. त्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे.
पुण्यात निर्बंध कडक
वाढत्या कोरोनारुग्णांचं प्रमाण बघता प्रशासनानं काही नियमात बदल केले आहेत. 69 प्रतिबंधित क्षेत्रात ( Micro containment Zones) निर्बंध अधिक कडक करण्यात येत आहेत. तर उर्वरित ठिकाणी पुणेकरांना थोडा मोकळा श्वास घ्यायला परवानगी देण्यात येणार आहे.
पुण्यात कोरोनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण 106 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात एकूण 76 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. पुण्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 2000 वर पोहोचली आहे. कोरोनाबळींची संख्याही शहरात मोठी आहे. आतापर्यंत या विषाणूने 107 लोकांचा जीव घेतला आहे. पुण्यात एकीकडे कोरोनारुग्णांची संख्या वाढत असताना आता या मायक्रोकंटेन्मेंट झोन म्हणजे छोट्या प्रतिबंधित क्षेत्रात (Micro containment zone in pune) निर्बंध कडक करण्यात आले आहेत.
रेड झोन (Red Zone) आणि प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) हे शब्द आता रोजच्या सवयीचे झाले आहेत. पण पुण्यात आता याहून अधिक नेमकी विभागणी करण्याचा निर्णय प्रशासनाने रविवारीच घेतला. आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
69 कंटेन्मेंट झोन कुठले?
मध्यवर्ती पुण्यातल्या सर्व पेठा (नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ वगळून), पर्वती दर्शन नीलायम, दांडेकर पूल, तळजाई वस्ती, शिवदर्शन, दांडेकर पूल, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, काकडे वस्ती, मीठानगर, कोंढवा, कात्रज, सुखसागरनगर, बालाजीनगर, धनकवडी- गुलाबनगर, अप्पर इंदिरानगर, प्रेमनगर, कामगार पुतळा, पाटील इस्टेट, शिवाजीनगर -म. गांधी झोपडपट्टी, येरवडा ताडीगुत्ता, जयप्रकाशनगर, गांधीनग ,नागपूर चाळ, फुलेनगर- येरवडा, धानोरी-कळस, वैदूवाडी, गोसावीवस्ती, सय्यदनगर, गुलामअलीनगर, सातववाडी, माळवाडी, हांडेवाडी, वेताळनगर, हडपसर- आदर्श कॉलनी, मीनाताई ठाकरे नगर, कोथरूड - शिवतारा सोसायटी, चंद्रगुप्त सोसायटी, ताडीवाला रस्ता, वडगाव शेरी, गणेशनगर, गुलटेकडी, डायस प्लॉट
Post A Comment:
0 comments so far,add yours