मुंबई, 15 मे : देशात कोरोनाव्हायरसचा प्रसार वेगानं होत आहे. देशातील कोरोनामुळं सगळ्यात जास्त प्रभावित राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. तर, मुंबईची स्थिती आणखी वाईट आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 998 नवीन प्रकरणं सापडली आहेत. तर, 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा पाहून मुंबईत प्रत्येक तासाला एकाचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आलं आहे. एकट्या मुंबईत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 19 हजार 579 आहे. तर 621 लोकांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातही मोठ्या वेगानं कोरोनाचा प्रसार होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा 27 हजारहून अधिक आहे. गेल्या तासांत सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत 1602 नवीन रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात आतापर्यंत 1019 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद आणि मालेगाव येथे 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतात.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours