मुंबई: राज्यात Coronavirus चा कहर कमी व्हायचं नाव घेत नाही. आज राज्यभरात 1495 रुग्णांची भर पडली. आता राज्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडा 25922 झाला आहे. सर्वात धक्कादायक आकडा मुंबईतून आला आहे. मुंबईत दिवसभरात 40 मृत्यू नोंदले गेले.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फे बुधवारी संध्याकाळी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यभरात दिवसभरात 1495 रुग्ण नव्याने दाखल झाले. तर 54 रुग्णांचा मृत्यू झाला. यातले 40 जण मुंबईत मृत्युमुखी पडले आहेत.
54 कोरोनाबाधितांचा मृत्यू नोंदला गेला. त्यापैकी 40 मुंबईचे, 6 पुण्याचे, 2 जळगावचे, 2 सोलापूर, 2 औरंगाबाद, 1 वसई-विरा आणि 1 मृत्यू रत्नागिरीत नोंदला गेला आहे.
आजपर्यंत राज्यातून 5547 रुग्णांना बरं झाल्याने घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यात 2 लाख 98 हजार 213 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 14,627 जण संस्थात्मक क्वारंटाईनमझ्ये आहेत.
देशव्यापी लॉकडाऊन 17 तारखेला संपतो आहे. त्यानंतर व्यवहार सुरू झाले, तर कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढू शकतो. तसंच आंतरराज्य वाहतूक सुरू झाल्यानंतर काही श्रमिक आणि कामगारांना आपापल्या गावी जाण्याची मुभा देण्यात आली. त्यामुळे आता कोरोनाचा धोका ग्रामीण भागातही वाढू शकतो, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. पुढील काही काळात महाराष्ट्रात कोरोनारुग्णांची संख्या वाढण्याचा धोका असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात चौथा लॉकडाऊन जारी करण्याशिवाय पर्याय नसल्याचंही त्यांनी नाशिकमध्ये बोलताना सांगितलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours