मुंबई, 05 मे : कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनची देशाला गरज असली तरी, याचा अर्थव्यवस्थेवर सगळ्यात मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र राज्याची परिस्थिती तर आणखी गंभीर झाली आहे. यासाठी आता राज्य सरकारच्या वतीनं नवीन विकासकामे आणि योजना तातडीनं थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळं राज्याचा 67 टक्के खर्च कमी होऊन, 70 हजार कोटी रुपये वाचू शकतात. यासंदर्भातील शासन निर्णय सोमवारी जाहीर करण्यात आले.

कोरोनाचा प्रसार वाढल्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सध्या सुरू आहे. यामुळं मार्चपासून राज्य सरकारला 60 हजार कोटींचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळं जीएसटी, विक्रीकर, उत्पादन शुल्क, मुद्रांक शुल्क यातून येणारे उत्पन्न थांबले आहे. त्यामुळं याआधी राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या वेतन कपात करण्याचाही निर्णय घेतला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours