मुंबई 25 मे : बॉलिवूडचे निर्माता- दिग्दर्शक करण जोहर यांच्या घरातही कोरोनाने प्रवेश केला आहे. त्यांच्या घरातल्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे करण जोहर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं आहे. करण जोहर यांच्या वतीने एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. आपण आणि कुटुंबीय सुरक्षित आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.
करण जोहर यांच्या घरात आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत होती. त्यानंतर त्यांना आयसोलेट करण्यात आलं होतं. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आता त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. ही सगळी माहिती प्रशासन आणि बीएमसीला कळविण्यात आल्याचं करण जोहर यांनी म्हटलं आहे.
हा अतिशय कठिण काळ असून आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्यात चांगले उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आम्ही सगळ्यांनी चाचणी करून घेतली आणि ती निगेटिव्ह आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या आधीही बोनी कपूर यांच्या घरी काम करणाऱ्या एकाला कोरोना झाल्याचं आढळलं होतं.
Post A Comment:
0 comments so far,add yours