मुंबई, 02 जून : मुंबईतील जीएसएमसीचे शल्यचिकित्सक आणि तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा करोनाने मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण वैदकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी सुजाता आणि मुलगी श्रद्धा असा परिवार आहे.
डॉक्टर भावे हे कान-नाक-घसा तज्ज्ञ होते. मटाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी रहेजा हॉस्पिटलमध्ये एका अत्यावस्थ असलेल्या कोरोना रुग्णावर तातडीची शस्त्रक्रिया केली होती. पण नंतर त्यांनाच कोरोनाची लागण झाली. यावेळी विशेष म्हणजे ते स्वत:च गाडी चावत रहेजामध्ये उपचारासाठी दाखल झाले. पण कोरोनाच्या महामारीत सगळ्यांसाठी झटणाऱ्या या डॉक्टरांना बेड मिळण्यासाठी तब्बल 10 तास वाट पाहावी लागील.
चित्तरंजन यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. चित्तरंजन यांना कोरोना झाल्यामुळे त्यांची पत्नी आणि मुलीला क्वारंटाईन व्हावं लागलं. डॉक्टर भावे यांच्या मृत्यूने मुंबईतील डॉक्टरांनी शोक व्यक्त केला आहे. डॉक्टर भावे हे अतिशय हुशार आणि मनमिळावू होते. त्यांची उणीव आम्हाला कायम भासत राहील, अशी भावना डॉक्टरांच्या संघटनेनं व्यक्त केली आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours