पुणे: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पाचवा टप्पा अवलंबण्यात आला आहे. पाचव्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आणि हळूहळू राज्य अनलॉक होण्याच्या मार्गावर आहे. पण अशात नियम शिथिल होताच पुण्यातील एका भागात रुग्ण झपाट्याने वाढल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्याने पोलिसांनी आज या भागातून रूटमार्च काढला आणि लोकांना शक्यतो घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये या भागात अवघे 12 रुग्ण होते. पण लॉकडाऊन 4 दरम्यान नियम शिथिल होताच इकडे रूग्ण संख्या थेट 372 वर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.


विशेषत: जनता वसाहत आणि पानमळा या स्लम एरियात कोरोनाची साथ वेगाने पसरू लागली आहे. त्यामुळे नियम जरी शिथिल झाले असले तरी अत्यावश्यक काम वगळता बाहेर न जाण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी शक्य तितकं घरात आणि सुरक्षित राहणं गरजेचं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours