मुंबई: कोरोनाच्या लढ्यात महाराष्ट्रातल्या डॉक्टरांना आता केरळमधल्या डॉक्टर्स आणि नर्सेसची मदत होणार आहे. सरकारच्या विनंती नंतर केरळने 100 जणांची एक टीम महाराष्ट्रात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 50 जणांची पहिली टीम मुंबईत पोहचली आहे. हे पथक सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये पोहोचलं असल्याची माहिती केरळचे आरोग्यमंत्री थॉमस इसाक यांनी दिलीय.

दुसऱ्या 50 डॉक्टर्स आणि नर्सेसचं पथकही लवकरच मुंबईत दाखल होणार होणार आहे असल्याची माहिती थॉमस इसाक यांनी दिली.

देशात सगळ्यात पहिला कोरोना रुग्ण केरळमध्ये सापडला होता. त्यानंतर केरळने शर्थिचे प्रयत्न करत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवलं. त्यानंतर त्या पॅटर्नची चर्चा सर्व देशात झाली होती. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे यांनीही केरळच्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करत त्यांनी कलेले प्रयत्न जाणून घेतले होते.

महाराष्ट्रातल्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असल्याने महाराष्ट्र सरकारतर्फे मदतीसाठी डॉक्टर्स आणि नर्सेसची मदत करण्याची विनंती केरळ सरकारला करण्यात आली होती. त्या विनंतीनंतर केरळ सरकारने हे पथक पाठवलं आहे.

महाराष्ट्रातल्या काही संघटनांनी केरळमधल्या नर्सेस महाराष्ट्रात येण्यास विरोध केला होता. आधी आपल्या इथे कमी असेल्या जागा भरा आणि नंतर इतर राज्यातून कर्मचाऱ्यांना बोलवा असा युक्तिवाद त्यांनी केला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours