मुंबई: 'आमच्यातील पालक जिवंत आहे. कोरानाचा संसर्ग सुरू असताना अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ शकत नाही. सर्व सत्र परीक्षांचे सरासरी गुण देऊन विद्यार्थ्यांना पास करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना इच्छा आहे परीक्षा देण्याची त्यांना सर्व सुरळित झाल्यावर तशी व्यवस्था करण्यात येईल,' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
'जे मी तुम्हाला सांगतो आहे, त्या सरकारच्या सूचना तुम्ही हिंमतीने पाळत आहात. आज मी तुमच्यासमोर आलोय तो लॉकडाऊन हा शब्द कचऱ्याच्या पेटीत फेकण्यासाठी आलो आहे. लॉकडाऊन करणं हा एक भाग झाला आणि सगळं हळूवार उघडणं हा दुसरा भाग झाला. पावसाळा तोंडावर आहे. पाऊस येऊन जातो आणि शेवाळ साचतं. त्यावेळी आपण पाऊल काळजीपूर्वक टाकतो. त्याप्रमाणेच लॉकडाऊनबाबतही यापुढेही आपल्याला पुढचं पाऊल हे खबरदारीने टाकायचं आहे,' असं म्हणत राज्याला संबोधन करताना उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन केलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील ठळक मुद्दे :
यावेळी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज आहे
पावसाच्या पार्श्वभूमीवर आपण बैठक घेवून तयारी केली आहे
येत्या दोन-तीन दिवसांत पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याचा धोका
आपली यंत्रणा सज्ज आहे
कोरोनासोबत जगायला आणि मुकाबला करायला शिका
बाहेर पडताना मास्क अनिवार्य, हात ध्यायला हवेत
यापुढे आपण ज्या गोष्टी सुरू करू त्या आपल्या कायमस्वरुपी सुरू ठेवायच्या आहेत, पण त्यासाठी शिस्त महत्त्वाची
गर्दी झाल्यास दुकाने बंद करावी लागतील
शिस्त दाखवून देशासमोर आदर्श ठेवू
5 तारखेपासून दुकाने तर 8 तारखेपासून कार्यालये सुरू करू
काय आहेत राज्य सरकारच्या गाईडलाईन्स?
नाईट कर्फ्यू - रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी
व्यायामासाठी खुल्या मैदानात जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. (सकाळी 5 ते सांयकाळी 7) मात्र गर्दी करण्यास बंदी
5 जूनपासून काही भागातील दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी
मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सना परवानगी नाही
नियमांचं उल्लंघन केल्यास दुकाने बंद करणार
वाहनांनाही परवानगी, मात्र प्रवासी संख्येला मर्यादा
कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक गोष्टींना परवानगी दिली जाईल. या भागांमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी केली जाईल
या झोनमध्ये येण्यास किंवा बाहेर जाण्यास परवानगी नाही
कन्टेन्मेंट झोनबाबत महापालिकांना अधिकार
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours