मुंबई, 14 जून :  अभिनेत्री किरण खेर आज बाॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी किरण यांनी बॉलिवूड अक्षरशः गाजवलं. पण, फार कमी लोकं आहेत ज्यांना त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल माहीत आहे. अगोदरच विवाहित असतानाही किरण पुन्हा एकदा प्रेमात पडल्या त्यांच्या लव्हस्टोरीत बरेच अडथळे होते मात्र त्यांनी ते पार केले आणि शेवटी प्रेमाचा विजय झाला.
कामानिमित्त मुंबईत आलेल्या किरण सुरुवातीला  गौतम बेरी यांच्या प्रेमात पडल्या. त्यांनी लग्न केलं. मात्र त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही. 1980 मध्ये चंदीगढमध्ये त्यांची ओळख अनुपम खेर यांच्याशी झाली. ते दोघंही एका नाटकाच्या ग्रुपमध्ये होते. या काळात अनुपम आपल्या खासगी आयुष्यात कठीण परिस्थितीतून जात होते. यावेळी किरण यांच्या रुपात अनुपम यांना एक चांगली मैत्रीण भेटली. अनुपम आणि किरण नाटकासाठी अनेकदा एकत्रच प्रवास करायचे. यादरम्यान त्यांची मैत्री अधिक घट्ट होत गेली आणि हीच मैत्री पुढे जाऊन प्रेमात बदलेल याची या दोघांनाही कल्पना नव्हती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours