पुणे, 14 जून : कोकण, अहमदनगर आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावल्यानंतर आज मुंबई पुण्यासह अनेक भागांमध्ये मुसधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं रविवारी मुंबई-ठाण्यासह उपनगर, पालघर आणि पुण्यात मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला. ठाण्यासह उपनगरांमध्ये पाऊस सुरू आहे.

कोकणातील काही भागांमध्ये तुफान पाऊस सुरू आहे. वैभववाडी तालुक्यात शनिवारी 225 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात 14 ते 16 जूनपर्यंत मुसळधार पाऊस होईल असा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड दौऱ्यावर जाणार होते मात्र मुसळधार पावसाचा इशारा असल्यानं त्यांनी दौरा रद्द केल्याची माहिती मिळाली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours