बीड, 12 जून : राज्यात कोरोनानं थैमानं घातलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्याआधी धनंजय मुंडे यांनी सोमवारी अंबाजोगाई इथे विषाणू निदान प्रयोग शाळेचे उदघाटन देखील केले होते. आता मुंडे यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली हे अद्याप स्पष्ट नाही. मुंडे यांच्यासह दोन स्वीय सहाय्यक, कार चालकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे.
धनंजय मुंडे बुधवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं संपर्कात आलेल्या मंत्र्यांसह अन्य लोकांनाही 28 दिवस होम क्वारंटाइन राहण्याचं आवाहन जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिलं आहे. ठाकरे सरकारमध्ये आतापर्यंत तिसऱ्या मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours