विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.

भंडारा, दि. ७ ऑक्टोंबर:- येथील शहिद वार्डात असलेल्या किवी रिफ्रेशमेन्ट अॅन्ड डेली निड्स या दुकानाला सकाळी ५ .३० वाजेच्या सुमारास आग लागली त्यात अंदाजे दिड ते दोन लाखाचे नुकसान झाले.

 सविस्तर वृत्त असे की,  कोरोना या संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढल्याने दीड वर्षापासुन जिल्हा प्रशासनाने लॉक डाऊन केले. त्यावेळी सर्व सामान्य जनते बरोबर लहान - मोठे दुकाने बंद करण्याची वेळ आली होती. त्यात अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. रोजगार बुडाले, आर्थिक संकट आले होते. लॉकडाऊन हटल्याने हळुहळु सुखी संसार सावरत असतांना शहिद वार्डात असलेल्या किवी रिफ्रेशमेन्ट अॅन्ड डेली निड्स या दुकानाचे मालक करण बोरकर व किरण बोरकर हे नेहमी प्रमाणे रविवारला राञी दुकान बंद करून घरी गेले. त्यावेळी बाळा गभने, राजेश वंजारी, अक्षय वाघमारे, शुभम गजभिये, प्रकाश वंजारी, अक्षय मेश्राम यांनी लागलेली आग विझविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. आगीत दुकानातील काही साहित्य जळुन खाक झाले आहेत. त्यात दिड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे.

 बोरकर यांना प्रशासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी बाळा गभने, राजेश वंजारी व नागरिकांनी केली आहे.

 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours