विलास केजरकर
जिल्हा प्रतिनिधी भंडारा.

भंडारा, दि.६ ऑक्टोबर:-
राज्यात कोविड-१९ कोरोना विषाणू प्रादुर्भाव असल्याने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दुर्गा, शारदा मातेच्या मुर्तीची स्थापना करून नवरात्र उत्सव, ईद, दसरा उत्सव साजरा करण्या संदर्भात पोलीस मुख्यालय भंडारा येथे दुर्गा, शारदा मंडळाचे अध्यक्ष तसेच पदाधिकारी यांची दि. ६ आक्टोंबर २०२१ रोजी, मास्क, सँनिटायझर तसेच सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन करून आगामी नवरात्र, दसरा व ईद उत्सव साजरा करण्यासंबंधी शांतता बैठक आयोजित केली होती.


 सदर बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील दुर्गा, शारदा मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच दसरा, ईद हे सण कोविड -१९ या संसर्गजन्य विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता नवरात्र उत्सव दरम्यान सदर रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आगामी नवरात्र उत्सव संबंधाने शासनाचे दि. ४ आक्टोंबर २०२१ रोजीचे परिपत्रकानुसार यावर्षी नवरात्र उत्सव साजरा करीत असतांना सामाजिक दुरावा राखून शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे काटेकोरपणे पालन करून अत्यंत साधेपणाने साजरा करण्यासंबंधाने जास्त गर्दी न करता दुर्गा, शारदा मातेची मूर्ती जास्त मोठी न ठेवता , नागरिकांना अवाजवी वर्गणी न मागता, विनाकारण डि.जे. , मोठे पंडाल न उभारता, मिरवणूका न काढता, उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करु नये, जेणेकरून सामान्य जनतेला आर्थिक अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत तसेच दुर्गा, शारदा मातेच्या मुर्तींचे विसर्जन नदी, तलावात न करता कृत्रिम तलाव तयार करून त्यात विसर्जन करावे, याबाबत सुचेना दिल्या. तसेच दुर्गा, शारदा मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी यांनी आपल्या मंडळातर्फे स्वयं प्रेरणेने गरजु लोकांची मदत करावी व सामाजिक जनजागृती करावे तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमल बजावणी करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून सदर उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे.
 सदर बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत  जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी जयंत चव्हाण,  ईश्वरदास काबरा, हिवराज उके, राहुल डोंगरे, उपपोलीस निरीक्षक रमाकांत दिक्षित, पोलीस अधिकारी, पोलीस पाटील, दुर्गा, शारदा मंडळ व मज्जिदचे पदाधिकारी तसेच शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours