भंडारा : जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमाचे उद्घाटन स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार धर्मेंद्र बोरकर यांनी केले. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक शिवा गायधने यांच्या हस्ते 'मानसिक आरोग्याविषयी जनजागृती काळाची गरज' या मअंनिसचे कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे यांनी लिहिलेल्या लेखांच्या प्रतींचे वाटप करण्यात आले. 'मानसिक आरोग्याची काळजी' या विषयावर प्रा. नरेश आंबिलकर, प्रा. युवराज खोब्रागडे, चंद्रशेखर भिवगडे विष्णुदास लोणारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 महाराष्ट्र शासनाने राज्यातील नागरिकांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये विवेकाची वाढ व्हावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करावे याबद्दलचे निवेदन मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत पाठवण्यात आले.या कार्यक्रमाला डमदेव कहालकर, डॉ. प्रवीण थुलकर, पुरुषोत्तम कांबळे, नितेश बोरकर, चंद्रशेखर बनकर,संदीप मारबते, विलास केजरकर,अरुण भेदे, सुरज परदेशी यासह अन्य मान्यवरांनी हजेरी लावली होती.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours