+आरोपी विरुद्ध ॲट्रॉसिटी व पोक्सो चा गुन्हा दाखल.
लाखांदुर प्रतिनिधी
तालुक्यातील दिघोरी /मोठी येथील एका अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून सतत बलात्कार केल्याची घटना घडली. सदर घटना तारीख 8 ऑक्टोंबर 2021 ला घडली. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन दिघोरी पोलिसात आरोपी नरेश बाबुराव नंदनवार वय 39 राहणार दिघोरी याच्याविरुद्ध अट्रोसिटी ,पोक्सो, व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास दिघोरी/ मोठी पोलिस करीत आहेत.
दिघोरी/ मोठी येथील नरेश बाबुराव नंदनवार वय 39 याने एका अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आणाभाका टाकत लग्नाचे आमिष दिले.व मागील दोन वर्षा पासून शारीरिक शोषण केले.यातुन पिडीताला गर्भधारना झाल्याने तर सदर पिडीतीने आरोपीला लग्न करण्यास विनवणी केली असता नरेश नंदनवार यांनी नकार दिला.ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याणी मुलीकडुन सदर प्रकरणाची चौकशी केली असता संबंधीत प्रकार समोर आल्यामुळे कुटुंबीयांसोबत पीडित तरुणीने दिघोरी/ मोठी पोलिसात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. यावरून आरोपी नरेश बाबुराव नंदनवार याच्याविरुद्ध कलम 376 ,पोक्सो व ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला .घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधू करीत आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours