विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.

भंडारा,दि. ८ ऑक्टोबर:-  क्रीडा व युवक सेवा व आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटयुट यांचे संयुक्त विद्यमाने बॉईज स्पोर्टस कंपनी, पुणे प्रवेशाकरीता क्रीडा नैपुण्य जिल्हास्तरीय चाचण्यांचे आयोजन दिनांक १२ ते १३ ऑक्टोबर, २०२१ ला सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज, जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे करण्यात आलेले आहे.आंतरराष्ट्रीय व ऑलम्पीक दर्जाच्या खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळ निहाय खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून सुसंघटीत प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी लहान मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये डायव्हींग, अॅथलेटिक्स, बॉक्सींग, कुस्ती, वेटलिफ्टींग, आर्चरी व ट्रायथलॉन हे खेळ समाविष्ट आहेत. याकरिता ८ ते १४ वर्षाखालील मुला-मुलींना चाचणी देता येणार आहे. क्रीडा नैपुण्य चाचणी आर्मी स्पोर्टस इन्स्टिटयुटचे जिल्हा स्तरावर दिनांक १२ ऑक्टोबर, २०२१ सकाळी ९ वाजता तलवारबाजी, बॉक्सींग, कुस्ती, आर्चरी, डायव्हींग, वेटलिफ्टींग, ट्रायथलॉन करिता तसेच दिनांक १३ ऑक्टोंबर सकाळी ९ वाजता अॅथलेटीक होणार आहे.

तरी जिल्हयातील इच्छुक शालेय विद्यार्थी ८ ते १४ वयोगटातील सदर क्रीडा नैपुण्य चाचण्याकरीता आवेदन अर्ज कार्यालयास दि. ११ ऑक्टोबर पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. डायव्हींग या क्रीडा प्रकाराकरीता वय मर्यादा ८ ते १० वर्ष राहील व इतर क्रीडा प्रकाराकरीता १० ते १४ वर्ष राहील. सदर क्रीडा नैपुण्य चाचणीला नियोजित दिनांक व वेळेवर हजर राहावे. याकरिता खेळ निहाय माहितीसाठी डायव्हींग, अॅथलेटीक्स, वेटलिफ्टींग, ट्रायथलॉन मनोज पंधराम ९५७९९२५९८०, बॉक्सींग, कुस्ती, तलवारबाजी, आर्चरी भोजराज चौधरी ९८५०७८९१८० यांचेशी संपर्क साधावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours