कर्मचारी किमान वेतनापासून वंचित
विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा,दि. ४ऑक्टोंबर :- पूर्व विदर्भातील राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गोसेखुर्द प्रकल्पाला मान्यता आहे. या ठिकाणी कंत्राटी पदावर अनेक कर्मचारी काम करीत आहेत. माञ तेथील कर्मचारी आपल्या किमान वेतनापासून वंचित असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गोसेखुर्द धरणावर १५ यांत्रिकी विभागात कंत्राटी पध्दतीने कर्मचारी काम करत आहेत. मात्र २०१६ पासून त्यांची वेतन वाढ , शासकीय सुट्टी , विम्याचा लाभ तसेच दिवाळी बोनस मिळत नसल्यामुळे हे सर्व कर्मचारी सोमवार पासून गोसेखुर्द कार्यालया बाहेर साखळी उपोषण साठी बसलेले आहेत. विशेष बाब म्हणजे यापुर्वी त्यांनी शासनाकडे अनेक पत्र व्यवहार केले मात्र त्याचा काहीच फायदा झालेला नाही. त्यामुळे आज पासून त्यांनी साखळी उपोषण सुरु केले आहे. महत्वाची बाब म्हणजे याच यांत्रिकी कर्मचाऱ्यांकडे गोसेखुर्द धरणाची जबाबदारी आहे. त्यामुळे आतातरी शासन लक्ष देणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
गोसेखुर्द धरण संघटनेचे अध्यक्ष धनराज बावणे, गोसेखुर्द यांत्रिकी कर्मचारी जयवंत बोरकर व इतर कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours