बचतगट वस्तू प्रदर्शनी प्रश्नमंजुषा व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
रामटेक: 'आझादी का अमृत महोत्सव' या विशेष उपक्रमांतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण नवी दिल्ली द्वारे आयोजित 'इंडिया फार टायगर्स रॅली ऑन व्हील' चे उत्स्फूर्त स्वागत श्री. नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेक येथे करण्यात आले.
वनपरिक्षेत्र अधिकारी रामटेक,नगरपरिषद रामटेक तसेच श्री. नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम नागझिरा नवेगावबांध येथून आलेल्या 'इंडिया फॉर टायगर्स रॅली ऑन व्हिल' चे स्वागत वनविभागाद्वारे मानवंदना देऊन करण्यात आले. या प्रसंगी महिला बचत गट गुगलडोह, भंडारबोडी, आमगाव, शितलवाडी येथील महिलांनी वनोपजापासून उत्पादित 'वनामृत' ब्रॅण्डचे
काळा तांदूळ, मोहफुल शरबत, गांडुळ खत,शहद ई. उत्पादन प्रदर्शनीचे उद्घाटन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे शतानिक भागवत तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच सदर उत्पादन विक्रीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुख्य कार्यक्रमाचे आयोजन श्री. नरेंद्र तिडके महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संगीता टक्कामोरे होत्या.या प्रसंगी नवेगाव नागझिरा येथील क्षेत्र संचालक श्री. रामानुजन, इंद्रावती टायगर रिझर्व्ह छत्तीसगडचे एस.एस. अग्रवाल,अमरकंटक व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक संचालक प्रल्हाद यादव, नवेगाव नागझिरा वनविभागाचे आत्राम, रामटेक नगर परिषदेचे मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, वनविभागाचे अजय कावळे तसेच नैताम आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत रोपटे तसेच वनविभागाचे टेबल बुक देऊन करण्यात आले.
याप्रसंगी पेंच व्याघ्र प्रकल्प नागपुरच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रश्नमंजुषाचे संचालन मानद वन्यजीव संरक्षक अजिंक्य भटकर यांनी केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री.नरेंद्र तिडके महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी पटकावला. याप्रसंगी रामटेक येथे वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करणारे निसर्गप्रेमी राहुल कोठेकर तसेच कचऱ्यापासून विविध वस्तूंच्या निर्मितीचे प्रशिक्षण देणारे भंडारा येथील महादेव साठवणे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नगरपरिषद रामटेकच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत उपस्थित सर्वांना पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शतानिक भागवत म्हणाले की "निसर्गाला सांभाळण्याची जबाबदारी मानवाची आहे.आज निसर्गाचे चक्र मानवाच्या अतिहव्यासापोटी बिघडले आहे. ही निसर्गाची मानवाने केलेल्या नुकसानाची भरपाई मानवाने वृक्षारोपण तसेच निसर्ग संवर्धन करून करणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामटेकचे सहाय्यक वनसंरक्षक एस. बी. गिरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नरेश आंबिलकर यांनी केले तर आभार डॉ. श्रीकांत भोवते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक भरतसिंग हाडा,पेंच व्याघ्र प्रकल्प नागपुरचे उपसंचालक प्रभूनाथ शुक्ला यांचे मार्गदर्शनखाली प्रा.स्वप्नील मनघे, प्रा.सुनील कठाणे,प्रा.अमरीश ठाकरे, डॉ. महेंद्र लोधी, वनविभागातील आर.एन. भोंगाडे, आर.एम. शिंदे,बि.एन. गोमासे,जी.ए.शेटे, बि.डी.माटे,ए.डी.वासनिक, विकी कुचेकर, राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.याप्रसंगी महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
प्रति,
माननीय
संपादक,तालुका प्रतिनिधी रामटेक
सप्रेम नमस्कार
महोदय,
सदर वृत्त आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात प्रकाशित करावे. ही विनंती.
आपला नम्र
प्रा. नरेश आंबिलकर
9423112181
Post A Comment:
0 comments so far,add yours