मअंनिसच्या वतीने म. गांधी जयंती साजरी भंडारा: महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे आयोजन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले होते.
त्रिमूर्ती चौक भंडारा येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मअंनिसचे जिल्हाध्यक्ष हर्षल मेश्राम हे होते. याप्रसंगी महिला मुक्ती मोर्च्याचे सचिव रवींद्र थानथराटे, अध्यक्ष मेहमूद खान पठाण यांचा 'अंधश्रद्धेची दुनिया चमत्कारांची किमया' ह्या पुस्तिका देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मअंनिसचे उपाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे,कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, नरेंद्र साखरकर, प्रा. युवराज खोब्रागडे, लीलाधर बन्सोड,शाहीर प्रकाश नाकतोडे, पुरुषोत्तम कांबळे, त्रिवेणी वासनिक, नितीन शहारे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रति,
माननीय संपादक जिल्हा प्रतिनिधी
महोदय
सदर वृत्त आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात प्रकाशित करावे.ही विनंती
आपला नम्र
नरेश आंबिलकर
भंडारा
९४२३११२१८१
Post A Comment:
0 comments so far,add yours