विलास केजरकर, 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा

भंडारा:- व्योम हॉस्पिटलच्या वतीने महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून स्वच्छता पंधरवडा निमित्ताने खमारी येथे आरोग्य तपासणी शिबिरात ९८ रुग्णांनी लाभ घेतला आहे.

       कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, डॉ. प्रेरणा कोहाड, सुनिल धाबेकर, कॅनेरा बॅंकेचे व्यस्थापक अविनाश कोहाड, आशा वर्कर संगिता मडामे, जयश्री धाबेकर, 

यांचेसह ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

      यावेळी बीपी, शुगर, दमा, नाडी शोधन, वाफारा, अशा प्रकारच्या विविध रोगांची नि:शुल्क तपासणी करून ९८ रुग्णांनी आरोग्य तपासणी  शिबिराचा लाभ घेतला.

        शिबिराच्या यशस्वीतेकरिता मदन बेदरकर, कुसूमबाई तिजारे, मारवाडे, मेश्राम, सुरेश भुरे, ठवकर, पारबता मते, दिक्षा बोरकर, प्रियंका डोंगरे, प्रौर्णिमा राणे, सुनिता समरित तसेच परिसरातील महिला-पुरूषांनी सहकार्य केले.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours