संतापाच्या भरात आईची दोन चिमुकली सह वैनगंगा नदित उड़ी घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिस स्टेशन हद्दितिल तिड्डी गावात घडली आहे. दीपाली शितलकुमार खंगार वय 27 वर्ष असे मृतक आईचे नाव असून देवांशी खंगार वय 3 वर्ष,वेदांशी खंगार वय दीड वर्ष असे मृतक चिमकल्याचे नाव आहे. आई ने हे कृत्य का केले याचे कारण अद्याप समजु शकले नाही. तिड्डी गावातील रहिवासी दीपाली ने आपल्या दोन मूली सह काल रात्रि 12 वाजता तिड्डी येथून जाणाऱ्या वैनगंगा नदित उड़ी घेऊन आत्महत्या केली. यांची माहिती कारधा पोलिसांना मिळताच त्यांच्या शोध सुरु केला असता आज सकाळी त्या तिघांचा मृतदेह सापडला आहे. लागलीच मृतदेह शव विच्छेदनाकरिता भंडारा सामान्य रुग्णालय दाखल करण्यात आला असून कारधा पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे...
नेहाल भुरे, भंडारा
9834004110
VIDEO-
Post A Comment:
0 comments so far,add yours