कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅनरा बॅकेचे मुख्य प्रबंधक योगेशकुमार शर्मा होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, कॅनरा बॅकेचे प्रबंधक अमोल घोलप, अधिकारी पियुष करणकोटे, पर्यर्वेक्षक कैलास कुरंजेकर, चित्रकला विभाग प्रमुख भारती सोनटक्के, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आर्थिक साक्षरता हा या चित्रकला स्पर्धेचा मुख्य विषय होता. या विषयांवरही सातवीच्या विद्यार्थ्यीनींनी चित्र काढले आहे. चित्रकला स्पर्धेकरिता शाळेतील ५० विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेत भाग घेणा-यांना विद्यार्थीनींना चित्रकला स्पर्धेचे साहित्य व पेन तसेच उत्कृष्ट चित्र काढणा-यांना अवनी डोंगरे, आर्या साकुरे, जान्हवी भागवते यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर अर्पिता शेंडे, निराली कुंभलवार यांना प्रोत्साहनपर बक्षीस भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले आहे.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थीनींना चित्रकला स्पर्धा व कॅनरा बॅकेच्या योजना विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच नविन मुलींची शाळा व्यवस्थापन मंडळाच्या पदाधिकारी व प्राचार्य निलु तिडके यांनी विजय प्राप्त करणाऱ्या विदयार्थिनींचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री केळवदे व प्रास्ताविक कॅनरा बॅकेचे प्रबंधक अमोल घोलप यांनी केले तर उपस्थितांचे आभार पर्यर्वेक्षक कैलास कुरंजेकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रविण चोपकर, जितेंद्र ईश्वरकर, धनश्री राऊत, कल्पना ठवकर, विभा नानोटी, नागरिकर, देशकर शिक्षक-शिक्षिकांनी तसेच विद्यार्थीनींनी सहकार्य केले.
Post A Comment:
0 comments so far,add yours