भंडारा:- पंतजलि योग समिती, किसान सेवा सेवा समिती, भारत स्वाभिमान न्यास व पंतजलि महिला योग समिती भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने भारत स्वाभिमान न्यासचा २८ वा स्थापना दिवस पतंजलि योग समिती खोकरला येथे मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला आहे. 

          कार्यक्रमाला पतंजलि योग समितीचे जिल्हा प्रभारी रत्नाकर तिडके, पंतजलि महिला समितीच्या माजी महामंत्री नीती जैन, योगशिक्षक मारोती पुडके, भंडारा जिल्हा किसान सेवा समितीचे जिल्हा प्रभारी सुरेश घोडे, पतंजलि किसान सेवा समितीचे भंडारा तालुका प्रभारी विलास केजरकर, आदर्श शिक्षक राहुल मेश्राम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

      त्यावेळी दैनंदिन योग प्राणायाम झाल्यानंतर हवन कार्यात सुरेंद्र पांडे व श्रद्धा पांडे यांनी यजमानचे स्थान भुषविले होते. 

        उपस्थित मान्यवरांनी योग साधकांना पतंजलि योग समिती, किसान सेवा समिती व भारत स्वाभिमान न्यास तसेच पतंजलि महिला योग समितीचे मुख्य उद्देश तसेच दैनंदिन जीवनात योग, प्राणायाम व स्वदेशी, योगाचे महत्त्व या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. 

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतंजलि योग समितीचे जिल्हा महामंत्री यशवंत बिरे यांनी केले तर तर उपस्थितांचे आभार दिलीप वालदे यांनी मानले.      

       कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गीता आगासे, बंडूभाऊ बेहरे, नितीन कडव, शालीनी बैस, गणेश उपासे, प्यारेलाल शहारे, रमेश बारबुदे, दमाहे, दामोधर बोदेले, महादेव खोकले, वंजारी तसेच पतंजली योग समिती खोकरला येथील महिला व पुरुष योग साधकांनी सहकार्य केले.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours