नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धा पांडेचेरी येथील स्पर्धेत महाराष्ट्र संघाला व्दितीय व फेडरेशन मध्ये व्दितीय स्थानी विजय मिळविल्याने महाराष्ट्र संघाने सिल्वर पदक जिंकले आहे. तसेच विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तिच्या कार्याची दखल घेतली जात आहे. तर प्राची चा अनेक ठिकाणी गुणगौरव केले जात आहे. एवढेच नव्हे तर प्राची ही नि:शुल्क स्थानिक नुतन कन्या विद्यालय व लाल बहादूर शास्त्री विद्यालय येथील मुलींना आट्यापाट्या या खेळाचे प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे शालेय क्रिडा स्पर्धेत या शाळेतील विद्यार्थीचा जिल्ह्यात व नागपूर येथे प्रथम व व्दितीय क्रमांक पटकावला आहे. अशा प्रकारे कामगिरी भंडारा जिल्हाच्या प्राची चटपने महाराष्ट्राचे नाव चमकविल्याने जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, प्राची केशव चटप ही भंडारा तालुक्यातील खमारी (बुटी) येथील भूमीहीन, निराधार दुर्गा केशव चटप यांची मुलगी आहे. ती भंडारा येथील जे. एम पटेल महाविद्यालयात बी. ए. व्दितीय वर्षात शिक्षण घेत आहे. अशा परिस्थितीत तीने गावाबरोबर जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे. अशा ग्रामीण भागातून नेतृत्व करत जिल्हयासह राज्यस्तरीय आट्यापाट्या क्रिडा सत्रात भंडारा जिल्ह्यातील मुलींच्या संघाला द्वितीय स्थान प्राप्त करून दिले होते. प्राचीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जिल्ह्याचे नाव लौकिक केले होते. त्यामुळे राष्ट्रीय खेळाडू म्हणून कु. प्राची चटप ची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली होती. प्राची चटपने आट्यापाट्या खेळाचे उत्कृष्ट बाजी मारून सेमी फायनल मध्ये कर्नाटक, केरळ व मध्यप्रदेश येथील चमुचा पराभव करून फायनल मध्ये प्रवेश घेतला. त्यात केरळचा पराभव केला व पांडेचेरी विरुद्ध महाराष्ट्र या संघात महाराष्ट्र संघाचा व्दितीय क्रमांक तसेच फेडरेशन मध्ये महाराष्ट्र संघाने कर्नाटक व मध्यप्रदेश या संघाचा पराभव केला. तर महाराष्ट्र व पांडेचेरी या संघात पांडेचेरी संघाचा प्रथम तर महाराष्ट्र संघाने व्दितीय क्रमांकाचा पारितोषिक पटकाविला आहे. यात महाराष्ट्र संघाने सिल्वर पदकाने गौरविण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर प्राची ही नि:शुल्क स्थानिक नुतन कन्या विद्यालय व लाल बहादूर शास्त्री विद्यालय येथील मुलींना आट्यापाट्या या खेळाचे प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे शालेय क्रिडा स्पर्धेत या शाळेतील विद्यार्थीचा जिल्ह्यात व नागपूर येथेप्रथम व व्दितीय क्रमांक पटकावला आहे. अशा प्रकारे कामगिरी भंडारा जिल्हाच्या प्राची चटपने महाराष्ट्राचे नाव चमकविल्याने जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
प्राची चटपने आपल्या यशाचे श्रेय आट्यापाट्या फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. व्ही. डी. पाटील, सचिव दिपक कवीश्वर, कोच व मार्गदर्शक श्याम देशमुख. संस्था सचिव डॉ. ललीत जीवानी, पुज्य सिंधी समाज अध्यक्ष जैकी रावलानी तसेच आई दुर्गा चटप हिला दिले असुन प्राची चटपचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल मेंढे, आमदार नाना पटोले, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजु कारेमोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, वाहतूक शाखा पोलीस निरिक्षक शिवाजी कदम, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, समन्वयक डॉ. कार्तिक पन्निकर, क्रीडा शिक्षक भिमराव पवार, रोमी बिष्ट, ई- मिडिया असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद भांडारकर, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक हितेंद्र वैद्य, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर, जिल्हा परिषद सदस्य रजनीश बन्सोड, समीर नवाज खमारी येथील नलिनी काळे, माजी सरपंच क्रिष्णा शेंडे, भंडारा क्रीडा व युवक मंडळांच्या सर्व खेळाडू पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील खेळाडू व नागरिकांनी. अभिनंदन केले आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours