तुमसर तालुक्यातील भंडारा- बालाघाट राज्यमार्गावरील रनेरा येथील वळणावर एका  मोटरसायकल चालकाने झाडाला धडक दिली. यात  त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 ते 12 वाजताच्या सुमारास  घडली. 


माणिकराम फुलचंद शहारे वय 40 वर्ष रा.वारा, ता.वाराशिवनी जिल्हा बालाघाट (मध्य प्रदेश) असे मृतक इसमाचे नाव असून तो आपल्या मोटरसायकल क्र. MP-50 M-T 5716 या दुचाकीने तुमसर वरून वारा (मध्यप्रदेश) गावाला जात असताना रनेरा येथील वळणावर दुचाकी अनियंत्रित झाल्याने झाडाला जब्बर  धडक दिली. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान आज सकाळी  रनेरा रोडावर मॉर्निंग वॉकिंग करणाऱ्यांना लोकांना तो आढळला. लोकांनी  सदर प्रकार दिसताच त्यांनी हरदोलीचे उपसरपंच धर्मेंद्र कटरे  यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तत्काळ सिहोरा पोलीस ठाण्यात माहिती दिली. यावेळी सिहोरा पोलीसानी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुमसरला रवाना केले. असून घटनेचा अधिक तपास सिहोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश गोसावी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार किशोर खोब्रागडे, मनोज इडपाते करीत आहेत.Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours