श्रद्धेच्या नावावर सार्वजनिक संपत्तीची नुकसान टाळावी....

भंडारा संपूर्ण महाराष्ट्रराज्यात शेतकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण म्हणजे बैलांचा पोळा. या सणाला शेतकरी बैलाचे खाद शेकतो खांदाला हळद लावले जाते.जागे मारबद ,जागे मारबद, अंमभरो कोटाभरो म्हणून बैलाची सेवा केली जाते वर्षभर कष्ट व मेहनत करणाऱ्या रबरब राबणाऱ्या बैलाला सजावट करून गावातील हनुमान मंदिरात घेऊन बैल जोडीची पूजा पाठ करून त्याला मोकळ्या ठिकाणी नेले जाते .  त्या ठिकाणी तोरण लावलेली असते त्या ठिकाणी बैलांच्या जोड्या एकत्र आणून एका रांगेत उभ्या केल्या जातात . गावातील माली समाजाचा व्यक्ती हातात पेटता टेंबा घेऊन फिरवितो त्याला मशाल असे म्हणतात. त्यानंतर बैलांच्या जोड्या घेऊन शेतकरी आपापल्या दिशेने निघतो. त्याला पोळा  सण असे म्हटले जाते.ही बैलां प्रति श्रद्धा आहे . ही श्रद्धा असायलाच पाहिजे. कारण या देशातल्या 140 कोटी लोकांना कष्ट करून पोसणारा जिवंत प्राणी म्हणजे बैल होय. त्यामुळे त्याचा आदर सत्कार करणे हा प्रत्येक भारतीयांचा या सणानिमित्त कर्तव्य आहे .या सणा निमित्त घरासमोर लावण्यासाठी हजारो लाखो पळस झाडांची कत्तल करून आणली जाते पळसाच्या डाळा आपापल्या घरी दाराजवळ पळस या झाडाच्या फांद्या उभ्या ठेवलेल्या असतात आणि त्या  दुसऱ्या दिवशी  झाडांच्या फांद्या व त्यासोबत मातीच्या बनवलेल्या मुर्त्या घेऊन जागे मारबद, राई रोग ढेकूल मोगसा घेऊन जागे मारबद अशा घोषणा देत श्रद्धेच्या नावावर सकाळी लोक रस्त्यावर परसाच्या डाळा व ती मारबद चौकातील रस्त्यावर पेटवतात त्यामुळे डांबरी रस्ता उकडतो रहदारीस अडथळा निर्माण होतो तसेच पर्यावरणाची मोठी हानी होतो .वेळप्रसंगी मोठ्या जोरात आग सुद्धा लागतो यामुळे नैसर्गिक संपत्तीची मोठ्या प्रमाणात श्रद्धेच्या नावावर नुकसानच होते याला श्रद्धा म्हणावी की काय असा प्रश्नन निर्माण होतो परंतु याकडे कोणाचेही लक्ष नाही ही अत्यंत वेदनादायी बाब आहे.म्हणून याकडे शासन व संबंधित अधिकारी यांनी सुद्धा लक्षणे देणे गरजेचे वाटते ,जिल्हा प्रशासनाने व शासनाने निर्बंध करणे गरजेचे आहे .श्रद्धा असावी परंतु सार्वजनिक मालमत्तेची पर्यावरणाची हानी होईल अशी श्रद्धा नसावी. सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे .ते कर्तव्य प्रत्येक नागरिकांनी पालन केले तर पर्यावरणाची हानी टाळता येईल व येणाऱ्या काळात श्रद्धेच्या नावावर होणाऱ्या पर्यावरणाची  होणारी नुकसान थांबवता येईल. सार्वजनिक संपत्ती म्हणजे आपलीच संपत्ती आपल्याच देशाची संपत्ती आहे श्रद्धेच्या नावावर तिच्या दुरुपयोग करने योग्य नाही त्याच्या सदुपयोग करावे .असे माझे मत आहे.श्रद्धेच्या नावावर सार्वजनिक मालमत्तेची हानी न करता पोळा सण उत्साह साजरा करावा.    याकरिता शासनाने उद्या येणाऱ्या पोळयाच्या पाडव्याला होणाऱ्या सणाकडे जातीने लक्ष द्यावे उपाययोजना करावे असे आव्हान करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ता विष्णुदास लोणारे मोबाईल नंबर 92 26 90 37 33 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours