*जैतपुर येथील घटना
*गजानन महाराज मंदीराची गेट लावीत असताना लागला करंट
लाखांदूर प्रतिनिधी,
तालुक्यांतील मौजा जैतपुर येथील संत गजानन महाराज मंदिराच्या गेट चे काम गेल्या तीन दिवसांपासून सुरू असून गेट चे काम पूर्ण झाले असता गेट उभी करतांनी सहा कामगारांना करंट लागला त्यात चंद्रशेखर खुशाल कुत्तरमारे वय 35 वर्ष रा. जैतपुर याला जोरदार करंट लागल्याने त्याला उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
चंद्रशेखर खुशाल कुत्तरमारे यांच्या मृत्यू पाच्यात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी बराच आप्त परिवार आहे त्यांचा मृत्यूदेह पोस्ट माटम साठी लाखांदूर ला हलविण्यात आले उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल
Post A Comment:
0 comments so far,add yours