भंडारा:- भंडारा ते कारधा रोडवर प्रसिद्ध असे सर्वांचे श्रद्धा स्थान असलेले साई मंदिर कारधा येथे आहे. निसर्गाचे पाऊस सतत आल्यामुळे या रस्त्यावर कंबरभर पाणी तुटुंब भरलेले असते. अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. जाणाऱ्या येणाऱ्यांची गर्दी होती, अनेक लोक पायी आणि टुव्हीलरने जाणे येणे करतात. जाणाऱ्या येणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात निसर्गाच्या पाऊस आले असता त्रास सहन करावा लागत असतो, अशातच अनेक नागरिकांनी सदर रस्त्यावर पाणी मोठया प्रमाणात असल्याचे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत पडोळे यांना सांगितले. भंडारा शहरातील खड्डे तात्काळ दुरुस्त करा, नागरिकांच्या जीवाशी खेडू नका, पावसात खड्डेमध्ये पाणी साचल्याने पायी, आणि जाणाऱ्या येणाऱ्यांचा अंदाज चुकतो. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत. खा.प्रशांत पडोळे यांनी भंडारा नगर परिषद सीओ करणकुमार चव्हाण यांना सोबत घेऊन तात्काळ कारधा साई मंदिर येथील रस्त्यावर पोहचले. नागरिकांची गर्दी जमा झाली. भंडारा ते साई मंदिर रोडचे पाणी तात्काळ काढण्याचे आदेश भंडारा नगर परिषद सीओ यांना भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी दिले.
सदर भंडारा ते कारधा साई मंदिर रोडला नेहमीच पाण्याचा त्रास असतो. पावसाळा आला की कायम स्वरूपी या रस्त्यावर पाणी असतो. गोसे विभागाच्या अधिकारी यांनाही संपर्क केला असता अधुरे काम तात्काळ पूर्ण करा असेही सांगितले. पाटबंधारे विभागाची लिफ्टची पाहणी केली. तलावाची साफ सफाई करा, आणि तात्काळ बुजलेल्या नाल्या खुल्या करा असे यावेळी त्याच कारधा येथील ठिकाणी गोसे विभागातील अधिकारी यांना सांगितले. इकोर्निया वनस्पती विल्हेवाट तात्काळ लावा असेही खा.प्रशांत पडोळे यांनी सांगितले.
Post A Comment:
0 comments so far,add yours