भंडारा : प्रत्येक कुटूंब निरोगी जीवन जगायला हवे. कुटुूंबातील बालकांपासून तर ज्येष्ठांपर्यंतचे आरोग्य सुदृढ असायला हवे. तरच कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला जाऊ शकतो. याकरिता प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता पाळून आजाराला हद्दपार करायला हवे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केले. लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे आयुर्वेदिक दवाखान्यात पार पडलेल्या आरोग्य शिबिराप्रसंगी ते बोलत होते. तालुका आरोग्य विभागाचे वतीने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांची तर उदघाटक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, पंचायत समिती सभापती मंगलाताई बगमारे, गट विकास अधिकारी देविदास देवरे, पंचायत समिती सदस्य श्री ठाकरे, सरपचं सौ. कल्पना खंडाते, उपसरपंच हरीचंद्र धोटे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अविनाश कुथे, डॉ. निखील डोकरीमारे,डॉ. अनुजा बागडे, डॉ.जया थोटे, डॉ. मुंडले,नेत्र चिकित्सक श्री डूंबरे, तालुका वैदयकीय अधिकारी श्री संजीव नैतामे यांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री रमेश डोंगरे म्हणाले, व्यसनमुक्त समाज ही काळाची गरज आहे. त्याकरिता लोकांनी स्वत: व्यसनापासून दूर राहावे. जेणेकरून मोठमोठया बिमारीपासून आपल्या शरीराला कुटूंबांना वाचविता येईल. आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करता येईल.
व्यसनमुक्त समाजासोबतच हागणदारीमुक्त कुटुंब ही आवश्यक आहे. याकरिता स्वच्छतेला प्राधान्य दयायला पाहिजे.
प्रत्येकाच्या अंगात स्वच्छता भिनली पाहिजे. आपला घर, परिसर व गाव स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. घर, परिसर व गावात स्वच्छता निर्माण झाली तर रोगराईपासून आपली सुटका होईल. आपल्या कुटुंंबाला चांगले जीवन जगता येईल, असे सांगितले.
प्रत्येक गाव हागणदारीमुक्त झालेला आहे. कुटूंबांनी शौचालयाचे बांधकाम करून त्याचा वापर सुरू केलेला आहे. परंतु अशंत: काही ठिकाणी उघडयावर शौचालयाला जाण्याचे प्रमाण आहे. सदर चित्र बदलविण्यासाठी प्रत्येक कुटूंबांनी शौचालयाचा वापर करून आपल्या गावातून रोगराईला आळा घाला असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी केले.
सोनी येथे आयोजित आरोग्य शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, गाव स्वच्छ आणि पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज आहे. याकरिता लोकसहभाग महत्वाचे आहे. हागणदारीमुक्त गावातील प्रत्येकांनी शौचालयाचा वापर करणे गरजेचे आहे. शौचालयाच्या वापरामुळे आपल्या कुटूंबांची सुरक्षा ठेवता येणार आहे. स्वच्छतेमुळेच आपल्या कुटूंबांला निरोगी आयूष्य जगता येणार आहे. त्यामुळे स्वच्छतेसाठी प्रत्येकांनी प्राधान्य दयायला हवा.
सोबतच पर्यावरणाचे रक्षणासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजाला व्यसनाधिनतेपासून दूर न्यायचे असे तर गावात दारूबंदी आवश्यक आहे. त्याकरिता महिलांनी पुढाकार घ्यावा. गावात ग्रामरक्षा दल स्थापन करून गावाची सुरक्षा करावी असे सांगितले.
आठशे रूग्णांवर झाले विविध उपचार
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डोंगरे यांचे पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या लाखांदूर तालुक्यातील सोनी येथील भव्य आरोग्य शिबिरात सुमारे आठशे रूग्णांवर उपचार करण्यात आले. यामध्ये सोनी, इंदूरा, चपराळ व अन्य गावातील रूग्णांचा समावेश आहे. अस्थिरोग तज्ञ डॉ. निखील डोकरीमारे, स्त्रिरोग तज्ञ डॉ. अनुजा बागडे, बालरोग तज्ञ डॉ.जया थोटे, दंतरोग चिकित्सक डॉ. मुंडले, नेत्र चिकित्सक श्री डूंबरे, तालुका वैदयकीय अधिकारी श्री संजीव नैतामे, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ. मेश्राम, डॉ. वानखेडे, व अन्य वैदयकीय अधिकारी, सर्व आरोग्य सेवक, सेविका यांच्या चमूने बिपी, शुगर, एचआयव्ही, मुखरोग, गरोदर मातांची तपासणी, दंत चिकित्सा, नेत्ररोग तपासणी, अस्थीरोग तपासणी व लहान बालकांची तपासणी करून सुमारे आठशे रूग्णांवर उपचार करण्यात आले. ग्रामस्तरावर आरोग्य सेवेला बळकट करण्यासाठी या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वैदयकीय चमूने सहकार्य केले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours