17 एप्रिल: उत्तर प्रदेशात गायब झालेले पैसे हे कर्नाटकात तर गेले नसतील अशी शंका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला.
दिलेल्या मुराखतीत कॅशलेस एटीएमच्या घटना फक्त भाजपप्रणीत राज्यात घडल्याचं आज चव्हाण यांनी सांगितलं. दरम्यान सरकारी पक्षाने मक्का मशीद खटल्यात पुरावेच सादर केले नाहीत आणि म्हणून आरोपी सुटले असा आरोप त्यांनी केला. दाभोळकरांपासून लंकेश यांच्या हत्यांबद्द्ल बोलताना विचारवंताच्या हत्या करणारे लोकंही दहशतवादीच आहे असा टोलाही त्यांनी सनातन संस्थेला लगावला.
तर दुसरीकडे या सरकारच्या काळात न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय असं विधानही त्यांनी केलं.यावेळी जस्टीस लोया प्रकरणाचा उल्लेखही त्यांनी केला. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांची फळी अस्वस्थ का झाली आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. कर्नाटकात आणि महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाच पण मोदी-अमित शहांना कमी लेखून चालणार नाही अशी सावध भूमिकाही त्यांनी घेतली.
Post A Comment:
0 comments so far,add yours