20 एप्रिल : ऑनलाईन मोबाईल विकणं नाशिकच्या एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. आपण पोलीस असल्याची बतावणी करत आणि चक्क पोलीस ठाण्यातुन बाहेर येत एका इसमानं एका तरुणाचा मोबाइल चोरुन नेला. गेल्या काही दिवसांपासुन अशापद्धतीनं पोलीस ठाण्यात येऊन लोकांना लुटणाऱ्या या भोंदु पोलिसाचा शोध नाशिक पोलीस घेत आहेत.
गेल्या काही दिवसांपासुन घडणाऱ्या घटना इथल्या कर्मचाऱ्यांना अस्वस्थ करणाऱ्या आणि लाजीरवाण्या देखील आहेत. चक्क पोलीस ठाण्यातून बनावट पोलीस म्हणुन चोर येतो आणि लोकांना लुटुन फरार होतो.
नाशिकच्या सादिक इनामदारनं मोबाइल विकायचा आहे अशी जाहिरात ओएलअक्सवर टाकली. एकानं त्याला फोन करुन मी पोलीस कर्मचारी आहे, तु मोबाइल घेवुन म्हसरुळ पोलीस ठाण्यात ये असं सांगितलं. सादिक आपला मोबाइल घेवुन पोलीस ठाण्याच्या बाहेर थांबला. आतुन हा बनावट पोलीस आला आणि साहेबांना तुझा मोबाइल दाखवतो असं सांगुन सादिककडुन मोबाइल घेऊन दुसऱ्या मार्गाने रफुचक्कर झाला.
म्हसरुळ पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली असली तरी गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या या घटना का घडत आहेत आणि त्याला रोकण्यासाठी काय करणार याबाबत इथल्या पोलीस अधिकाऱ्यांकडे काहीही उत्तर नाही.
शहरात चेनस्नॅचिींग आणि मोबाइल चोरीच्या घटना तर सर्रास घडत आहेत. मात्र थेट पोलीस ठाण्यातुनच बनावट पोलीस बाहेर येऊन लोकांचे मोबाईल चोरत असल्यानं ही मात्र हद्दच झाल्याचं बोलंल जातंय.
पोलीस ठाण्यात लावलेले सीसीटीव्ही काम करत नसले तरी परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीनं आता या खोट्या पोलिसांना नाशिकचे खरे पोलीस शोधत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours