ठाणे : ठाणे जिल्ह्यात बदलापूर हे एकमेव शहर आहे जिथे एप्रिल महिन्यात शिवजयंती साजरी करण्यात येते. 98 वर्षांची परंपरा असलेला शिवजयंतीचा उत्सव 3 दिवस साजरा केला जातो.
सिंधुदूर्ग किल्ल्यानंतर बदलापूर गावात शिवाजी महारांजांचं देऊळ आहे. 1967 साली महाराजांच्या मूर्तीची इथं विधीवत पूजा करण्यात आली. एकेकाळी हे शहर चांगल्या प्रतीच्या घोड्यांसाठी प्रसिद्ध होतं, महाराजांचं सैन्य या ठिकाणांहून घोडे बदलत असल्यानं या शहराचं नाव बदलापूर पडलं.
खरंतर शिवजयंतीबाबत अनेक वाद आहेत, पण इथं मात्र 98 वर्षांपासून हिंदू-मुस्लीम एकत्रित शिवजयंती साजरी करतात. मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात येते, ढोल-ताशाच्या गजरात भलीमोठी मिरवणूक काढली जाते, हरिनामाचा गजर करत महाराजांची पालखी निघते. यासाठी हजारो शिवप्रेमी बदलापुरात दाखल होतात.
Post A Comment:
0 comments so far,add yours