सोमवार, 28 मे 2018
TV9 PLUS NEWS

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला संथगतीने सुरूवात झाली आहे. या मतदारसंघातील जवळपास 100 मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी प्रशासनाला मिळाल्या आहेत. या केंद्रावर नव्या मशीनचे व्यवस्था केली जात आहे.

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला संथगतीने सुरूवात झाली आहे. या मतदारसंघातील जवळपास 100 मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी प्रशासनाला मिळाल्या आहेत. या केंद्रावर नव्या मशीनचे व्यवस्था केली जात आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे अत्यंत अल्प प्रतिसाद पहिल्या काही तासामध्ये मिळाला आहे. उन्ह व उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे मतदानाला बाहेर निघण्याचे प्रमाण कमी राहील, अशी भीती व्यक्त केली जात होती. ही भीती खरी निघण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी ईव्हीएम मशीनच्या क्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उभे केले होते. त्यानुसार या मतदारसंघातील जवळपास 100 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला आहे. भंडारा जवळील कोकर्ला येथील मतदान केंद्रावर मशीन बिघडल्याने तेथील लोकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना या गैरप्रकाराची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन दुसऱ्या मशीनची व्यवस्था करण्याचे निर्देश संबंधीत मतदान केंद्राधिकाऱ्यांना दिले.



तुमसर:तुमसर विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी अनेक evm व vv pat मशीन काम करत नाही म्हणून तक्रारी आल्या दाह अकरा वाजेपासुन मतदान बंद आहे . ते आता सुरू करण्यात आले निवडणूक आयोगाने आजच्या निवडणुकीत technical engg च्या फक्त 5 नियुक्त्या केल्या आहेत त्यामुळे सगळीकडे हाहाकार आहे रात्रीच्या अंधारात अनेक कर्मचारी व अधिकारी येऊन कुठली सेटिंग केली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

अशाच तक्रार अनेक तालुक्‍यातून येत आहेत. कडक उन्हामुळे ईव्हीएम मशीन 'हॅंग' होत असल्याचा बचाव निवडणूक अधिकाऱ्यांनी केला आहे. परंतु या मशीन अधिक उष्णतामानात काम करणाऱ्या असतात, याबद्दल निवडणूक आयोगाकडून चाचणी घेतली जाते. या चाचणीचे मग काय झाले, असा सवाल कॉंग्रेसचे नेते व माजी खासदार नाना पटोले यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केला आहे. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या बद्दलचे व्हीडीओ व फोटो काढले आहेत. मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद झाल्यानंतर पुन्हा मतदार मतदान केंद्राकडे फिरकत नसल्याचा आरोप काँग्रेसचे कार्यकर्ते रिकी पटोले यांनी केला आहे.




Manro high School bhandara yetil room no. 1 madhil mashin kharab zalya mule voteing रद्द झालेली आहे

खात रोड बन्सीलाल लाहोटी शाळा रुम नं 109 येथे 11:30 वाजतापासून मशीन बिघाड, अजूनही नवीन मशीन आली नाही

दनादन evm बंध होत आहेत पूर्ण यंत्रणा धराशाही 76 मशीन भंडारा विधानसभा मधे बंध

भंडारा शहरातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय येथील 2 मशीन, बेशीक शाळा, नुतन कन्या शाळा, भगतसिंग शाळा येथील EVM मशीन बंद पडल्या..

गोंदिया,दि.28- पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या दोन्ही मतदारसंघातील मतदान केंद्रावर मोठ्याप्रमाणात व्हीव्हीपीटी मशीनमध्ये बिघाड आल्याने मतदान थांबले आहे.त्यातच गोंदिया शहरातील गणेशनगर येथील मतदान केंद्र क्रमांक 225 व मरारटोली येथील बीएचजे काॅलेजमधील मतदान केंद्र क्रमांक 169 मध्ये मतदान बंद करण्यात आले आहे.तसेच फुलचूर येथील मतदान केंद्र 303 ए येथील केंद्रावरील व्हीव्हीपीटी मशीनमध्ये बिघाड आल्याने मतदान बंद करण्यात आले आहे.व्हीव्हीपीटी पॅडमशीनचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला मात्र याठिकाणी ही मशीन पुर्णता निकामी ठरली आहे.



सकाळपासूनच मतदारसंघातील बहुतांश मतदान केंद्रावर मशीनमध्ये बिघाड येत असल्याने राजकीय पक्षातील कार्यकर्त्यामध्ये नाराजी दिसून येत आहे.गणेशनगर बुथवर नगरसेवक राजकुमार कुथे,कुशल अग्रवाल,आलोक मोहंती,संदिप रहागंडाले,बीएचजे मतदान केंद्रावर नगरसेवक घनश्याम पानतवने आदींनी मतदानकेंद्रातील बिघाडाबाबत नाराजी व्यक्त केली.गोंदिया शहरातीलच सिंधी शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 281 व संत तुकाराम हायस्कुल गायत्रीमंदीर चौक मतदान केंद्रावरही मतदान बंद पडले आहे.सरस्वती शिशु मंदिर,गोंदिया केन्द्रातील बूथ क्र. 253 वरील मशीन मध्ये बिघाड झाल्याने मतदान थांबले.सडक अर्जुनी तालुक्यातील मतदान केंद्र क्रमांक 163 कोकणा जमी येथील मतदान केंद्रावरही मतदान योग्य होत नसल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.उमरझरी,परसोडी,सौंदड येथील मतदान केंद्रावरही एक तासाहून अधिक काळापासून मतदान प्रकिया ठप्प पडली आहे.दवनीवाडा येथील मतदान केंद्रवारही मतदान बंद पडले आहे.

गोंदिाय विधानसभा मतदारसंघात 75 च्यावर बुथवर मतदान प्रकिया बंद असल्याचे वृत्त आहे.निलज येथील मतदान केंद्रावर तर मतदानच 1 तास उशीराराने सुरु झालेले आहे.तिरोडा मतदारसंघातील शहारवानी,कवलेवाडा,गोरेगाव,त्याचप्रमाणे लाखांदूर ( भंडारा ) तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावरील मशीन मध्ये बिघाड आला आहे.त्यामध्ये किन्हाळा, चिंचोली खैरना, मोहरणा, डोकेसरांडी व इतर अनेक केंद्रावर मतदान प्रक्रिया थांबली असूनमतदान केंद्र अधिकारी अभियंत्याच्या प्रतीक्षेत वाट बघत बसले आहेत. लाखनी तालुक्यातील मोरगाव, राजेगाव येथील बु़थ नं 54 व 55 मतदान मशिन मधे बिघाड आला असून 1तासापासून मतदान बंद पडले आहे.

तापमानामुळे मशीन खराब झाल्याचे अधिकारी सांगतात.

गोंदिया उपविभागीय अधिकारी व निवडणुक निर्णय अधिकारी अनंत वालस्कर यांनी सांगितले की गोंदिया विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रातून ७५ तक्रारी आल्या काही सोडवल्या ३४ तक्रारी सोजविल्या आतापर्यत १४३ तक्रारी आल्या व्हीव्हीपटच्या तक्रारी अधिक आल्या मतदान झाल्यानंतर बंद पडल्याने अडचन निर्माण झाली ६ व्हीव्हीपट फक्त शिल्लक आहेत

तापमानामुळे मशीन खराब झाल्याचे अधिकारी सांगतात.

गोंदिया विधानसभा मतदारसंघातील 38 बुथवरील मतदान प्रकिया बंद करण्यात आल्याची घोषणा निवडणुक अधिकारी अनंत वालस्कर यांनी केली आहे.

गोंदिया विधानसभा मतदारसंघातील 38 बुथवरील मतदान प्रकिया बंद करण्यात आल्याची घोषणा निवडणुक अधिकारी अनंत वालस्कर यांनी केली आहे.

प्यानीक होंऊ नका.मतदान सुरळीत सुरु.तापमानामुळे  मशीन मध्ये बिघाड.-  जिल्हाधिकारी

प्यानीक होंऊ नका.मतदान सुरळीत सुरु.तापमानामुळे  मशीन मध्ये बिघाड.-  जिल्हाधिकारी

४५० ईव्हिएम बंद. जाणिवपूर्वक घोळ केल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

भंडारा गोंदियात ३८ ठिकाणी ईव्हिएम बंद पडल्याने आज मतदान होणार नाही.

प्रफुल पटेल निवडणुकीत ज्याप्रमाणे आशंका होती सर्व मसीन सुरत वरून आनली गेली ६०-६५ मसीन प्रत्येक मतदारसंघात मसीन बंद पाल्ट होते गोंदिया तील ३४ मतदारसंघात प्रकिया थाबवली त्यामुले परत ंतदान होनार तापमान अधिक असल्यामूले मसीनते सेस़र काम करीत नाही असे अभियंत्याचे ं्हनने आहे मार्च ते जून तापमान देसात असते असा परिस्थितीत निवडनूक मजाक बनेल सध्या ज्या मसीनमद्ये चिट्या पडल्या त्या सर्व मोजन्यात यावे पुरेन जगात प्रगतीसील देसात ईव्हीएमने निवडणुका घेत त्यानी बंद केले त्यामुले भारतात याचा विचार व्हावा सर्व राजकिय पक्षानी विचार व्हावा युपीमद्येही हा प्रकार होत आहे रिपोल लवकर व्हावे जोपर्यत रिपोल होत नाही तोपर्यंत देसातील इतर पोटनिवजनुकीची मतमोजनी करू नये कारन त्या मतमोजनीचा प्रभाव पडू नये निवडणुक निरिक्षकाना तक्रार दिल्यानंतरही त्यांनी दुर्लक्ष केले चिंतनिय आहे लोकत्त्र मिवडनुकीतून मजबूत आहे विसरता येनार नाही मसीन बंद करून बलेट वर यावे
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours