गोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयोगासह सरकारला चांगलेच धारवेर धरले आहे. ‘महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं पुरेशी असताना ती सुरतहून का मागवण्यात आली,’ असा सवाल काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच तक्रारीच्या माध्यमातून उपस्थित केला होता.त्याकडे निवडणुक आयोगासह जिल्हा निवडणुक अधिकारी व निवडणुक निरिक्षकांनी दुर्लक्ष केल्यामुळेच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत  जिथे, जिथे ईव्हीएममध्ये घोळ झाला आहे तिथे फेरमतदान घेण्याची मागणी करीत फेरमतदान होईपर्यंत देशातील पोटनिवडणुकींचा निकाल थांबविण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व खासदार प्रफुल पटेल यांनी आज केली आहे. सोबतच उत्तरपद्रेशातही आज होत असलेल्या पोटनिवडणुकीत ईव्हीएम मशीनध्ये बिघाड येत असल्याची माहिती समाजवादी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेशसिंह यादव यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले.पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच ठिकठिकाणांहून ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. व्हीहीपॅटही व्यवस्थित मिळत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे काही मतदान केंद्रावर मतदान स्थगित करण्यात आले. या संपूर्ण गोंधळासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी निवडणुक आयोग व सरकारला जबाबदार धरले आहे. ‘तापमान जास्त असल्यामुळं ईव्हीएम बंद पडत असल्याचे कारण धक्कादायक आहे. ही निवडणूक प्रक्रियेची थट्टाच आहे. एप्रिलमध्येही अनेकदा ४५ टक्के तापमान असते. म्हणजे उन्हाळ्यात निवडणुका घ्यायच्याच नाही का, असा प्रश्न पटेल यांनी केला. गोंदिया विधानसभा मतदारसंघातील 34 मतदान केंद्रावर मतदान थांबविण्यात आले असून त्याठिकाणी कधी फेरमतदान होणार हे निवडणुक आयोगावर अवलंबून असल्याचे सांगत मतदारांना मात्र निवडणुक विभागाच्या गोंधळामुळे मनस्ताप सहन करावा लागल्याची टिका व्यक्त केली.

तसेच जिल्हा निवडणुक अधिकारी डाॅ.अभिमन्यू काळे यांनी आचारसंहितेचे उल्लंघन करीत 25 व 26 मे रोजी बॅंका सुरु ठेवण्याचे पत्र देत शुक्रवारला रात्री 11 वाजेपर्यंत कोषागार कार्यालय सुरु ठेवून बोनसचे धनादेश बँकेत टाकण्याची केलेली कारवाई अयोग्य असल्याने त्यांच्यावर सुध्दा निवडणुक आयोगाने त्वरीत कारवाई करायला हवे असे पटेल म्हणाले.

‘ज्या ठिकाणी मशीन बंद पडले, तिथं फेरमतदान घेण्यात यावे. तोपर्यंत देशातील कुठल्याही पोटनिवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी करू नये, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. ‘पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे, असे मत त्यांनी मांडले. मतपत्रिकेमुळं निवडणूक प्रक्रिया लांबेल. निकालाला उशीर लागेल, अशी कारणे दिली जात आहेत. पण ही कारणे काही शोभणारी नाहीत.अमेरिकेतही दोन-तीन दिवस मतमोजणी सुरू असते.आपल्याकडेही आधी मतपत्रिकेनेच मतदान व्हायये.प्रगतशील देशांनी ईव्हीएम नाकारून मतपत्रिकेचा मार्ग स्विकारला आहे.त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पुन्हा यामुद्यावर एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत आपल्याकडे निकाल उशीर लागला तर असे काय आभाळ कोसळणार आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours