रिपोर्टर:- हर्षीता ठवकर

    भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक  सोमवार दि. २८-०५-२०१८ रोजी पार पडले असून यात पूर्ण लोकसभा क्षेत्रात ग्रामीन आणि शहरी भागात मतदान केंद्रावरील अनेक EVM मशीन व VV  पॅट बंद झाल्यामुळे मतदान केंद्रात मतदानासाठी आलेले मतदार त्रस्त होऊन परत निघून गेले. त्यामुळे या पोटनिवडणुकीत EVM  मशीन व VV पॅट बंद असल्याच्या अनेक तक्रारी आल्यामुळे निवडणूक आयोगाने तीन तासाच्या वर बंद असलेल्या EVM व VV पॅट मशीनच्या बूत केंद्रावरील फेर निवडणूक उद्या दि.३०-०५-२०१८ ला होण्याची शक्यता आहे. लोकसभा क्षेत्रातील अंदाजे 49 बुथ केंद्रात फेरणीवडणूक होणार.
   गोंदिया विधानसभा क्षेत्रातील 21 बूथ केंद्रावर , तिरोडा विधानसभा 8 बूथ केंद्रावर, भंडारा विधानसभा क्षेत्रातील 14 बूथ केंद्रावर, साकोली विधानसभा क्षेत्रातील 4 बुथ केंद्रावर,अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात 2 बुथवर फेर निवडणुक होणार हे निश्चित झाले असून या संबंधाने निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ पोटनिवडणूक 2018 साठी खालील नमुद मतदान केंद्रावर फेरमतदान बुधवार, 30 मे 2018 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. फेरमतदान असणाऱ्या क्षेत्रात मतदान करण्यासाठी शासकीय सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे 30 मे रोजी कोरडा दिवस लागू करण्यात आला आहे.
61-भंडारा विधानसभा- 302- अडयाळ, 320नवेगाव, 318-उमरी, 335-पिंपळगाव, 403-पवनी, 405-पवनी, 374-खैरी दिवाण, 314-पिलांद्री, 317-केसलवाडा,322-पाथरी पुर्नवसन, 362-लोणारा, 363-लोणारा, 428-वलनी, 429-वलनी एकूण 14 केंद्र.
62- साकोली विधानसभा-306-पारडी, 316-मुरमाडी, 292-तई बु., 287- घोडेझरी एकूण 4 केंद्र. 63-अर्जुनी मोर विधानसभा-108-बोथली, 159-मानेरी एकूण 2 केंद्र. 64-तिरोडा विधानसभा- 45-अत्री, 97-दवनीवाडा, 102-पिपरटोला, 108-विहीरगाव, 205- भजेपार, 215-पिंडकेपार, 38-मुरदाळा, 52-पालडोंगरी एकूण 8 केंद्र. 65-गोंदिया विधानसभा- 50-सोनपूरी, 78-चारगाव, 94-रतनारा, 115-कामठा, 116-कामठा, 117-कामठा, 123-लांबटोला, 169-गोंदिया, 176A-गोंदिया, 194-गोंदिया, 200-गोंदिया, 206-गोंदिया, 218-गोंदिया, 225-गोंदिया, 233-गोंदिया,240-गोंदिया, 250-गोंदिया, 253-गोंदिया, 271-गोंदिया, 276-गोंदिया, 303 A- फुलचुर एकूण 21 केंद्र असे एकूण 49 मतदान केंद्रावर फेरमतदान होणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours