संपादिका- सुनीता परदेशी
भंडारा,दि.29ःभंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचे निवडणुक अधिकारी व गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची आज मंगळवारला अचानक सरकारने तडकाफडकी बदली केल्याचे वृत्त धडकले आहे.लोकसभा पोटनिवडणुकीतील नियोजनाचा अभाव व समन्वयाचा फटका काळे यांना बसल्याची चर्चा सुरु आहे.त्यातच नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या कादंबरी बलकवडे यांची गोंदिया जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी काळे यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात 25 व 26 मे रोजी बँका सुरु ठेवून बोनस व तुडतुड्याचे नुकसानभरपाईचे पैसे शेतकर्यांच्या खात्यावर वळते करण्यासाठी शुक्रवारला रात्री 11 वाजेपर्यंत कोषागार कार्यालय सुरु ठेवण्याचे दिलेल्या निर्देशावर राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुक आयोगाकडे तक्रार केली होती.त्या तक्रारीच्या चौकशीनुसार काळे यांनी आचारसहिंता भंग केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने त्यांची बदली झाल्याची सुत्रांनी माहिती दिली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours