मंगळवार 29 मे 2018

येथील लोकसभा पोटनिवडणुकीत अनेक केंद्रावर ईव्हीएममध्ये झालेला बिघाड तांत्रिक कारणांमुळे नसून तीव्र उन्हामुळे असल्याचा अजब बचाव निवडणूक अधिकारी करीत आहेत. भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी गुजरातमधील सूरतमधून ईव्हीएम आणले आहेत. 

भंडारा-गोंदिया : येथील लोकसभा पोटनिवडणुकीत अनेक केंद्रावर ईव्हीएममध्ये झालेला बिघाड तांत्रिक कारणांमुळे नसून तीव्र उन्हामुळे असल्याचा अजब बचाव निवडणूक अधिकारी करीत आहेत. भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी गुजरातमधील सूरतमधून ईव्हीएम आणले आहेत. 

गुजरातमधून ईव्हीएम आणल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी विरोध केला होता. महाराष्ट्रात ईव्हीएम उपलब्ध असताना व राज्यात कोणत्याही निवडणुका नसताना गुजरातमधून ईव्हीएम मशीन आणण्याचे औचित्य काय? असा सवाल पटेल व नाना पटोले यांनी केला होता. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे यापूर्वीच लेखी तक्रार नोंदविली आहे.

या तक्रारीची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली नाही. आज मतदानाच्या दिवशी अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर उन्हामुळे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा बचाव अधिकारी करीत आहेत. हा बचाव काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पटलेला नसून अधिकारी मुद्याम मतदान होऊ नये, याची काळजी घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करीत आहेत. या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांनी लेखी पत्रात उन्हामुळे ईव्हीएममध्ये बिघाड होत असल्याचा दावा केला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours