रिपोर्टर---जाफरी
सातारा : अल्पवयीन मुलीशी खोटे लग्न करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर बाळासाहेब मुजावर (रा. सय्यद कॉलनी, करंजे नाका), दिशान आतार (रा. शाहूपुरी), इब्राहीम व आपटे गुरुजी अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, अल्पवयीन मुलीला शहरातील एका शाळेच्या परिसरातून समीर मुजावर याने रिक्षामधून पळवून नेले. तसेच दिशान आतार, इब्राहीम व आपटे गुरुजी यांच्या मदतीने खोटे लग्न लावून त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.

तसेच वेळोवेळी विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे करीत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours