भंडारा, ता.31 मे: विदर्भ हा भाजपचा गढ मात्र याच गढात मतदारांनी भाजपला आपली जागा दाखवून दिली. नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळं ही पोटनिवडणूक झाली. त्यामुळं ही जागा भाजपनं प्रतिष्ठेची केली होती. पटोलेंनी ही निवडणूक लादली असा प्रचार भाजपने केला. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.
भंडारा-गोंदिया ही जागा राष्ट्रवादीने घेतली म्हणून नाना पटोले नाराज झाले होते. पण नाराजी दूर करून नाना भाजपच्या पराभवासाठी झटत होते. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी झंझावती प्रचार केला. कुठल्याही परिस्थितीत ही जागा जिंकणारच असा विश्वास मुख्यमंत्र्यांना होता. ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे विश्वासू चंद्रशेखर बावनकुळे हे महिनाभरापासून भंडारा-गोंदियात ठाण मांडून होते.
पण त्याचा फायदा झाला नाही. राष्ट्रवादीला जागा मिळूनही राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल पटेल यांनी प्रचारात पाहिजे तसा रस घेतला नाही अशीही चर्चा होती मात्र या सर्व शक्यता नाकारत जनतेनं राष्ट्रवादीच्या पारड्यात आपलं मत टाकलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours