मुंबई,ता.31 मे: युतीसाठी आम्ही तयार आहोत आता निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. पालघरच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न केला.
विविध विषयांवर काय म्हणाले मुख्यमंत्री?
पालघर आणि गोंदिया
भाजपला कौल दिल्याबद्दल पालघरच्या जनतेचे आभार. ही निवडणूक क्लेषदायक होती. मित्रांमध्येच कटुता निर्माण झाली. शिवसेनेनं ठरवलं असतं तर ही कटुता टाळत आली असती. आता निवडणूक संपली आहे त्यामुळं कटुताही विसरली जावी.
युतीसाठी तयार
ज्या पक्षांविरूद्ध आयुष्यभर लढलो त्या पक्षांसोबत शिवसेना जाणार नाही असं वाटते. युतीसाठी भाजपने सदैवच पुढाकार घेतला आहे. मात्र युती किंवा चर्चा ही एकतर्फी होत नसते. चर्चेसाठी आम्ही सदैव तयार आहोत आता निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे. एकत्र लढण्यातच दोघांचाही फायदा आहे.
भंडारा गोंदियाचा पराभव
भंडारा गोंदियात भाजपने चांगला प्रचार केला होता. पराभव आम्ही स्विकारला असून तो मान्य आहे. कुठे चुका झाल्या ते आम्ही तपासून पाहू. तिथल्या जनतेनं कायम भाजपलाच साथ दिली आहे आणि यापुढेही देतील.
ईव्हिएम आणि निवडणूक आयोग
भंडारा-गोंदियात ईव्हएममध्ये जो बिघाड झाला त्याचा फटका भाजपला बसला. निवडणूक आयोगानं याची दखल घेतली पाहिजे. निवडणूक आयोग निष्पक्ष आहे. भंडारा-गोंदियात भाजपचा पराभव झाल्यामुळे आतातरी विरोधीपक्षांचे ईव्हीएम विरोधातले आरोप थांबतील. या सर्व प्रकरणांची चौकशी करून ते प्रश्न आयोगानं सोडवले पाहिजे.
श्रीनिवास वनगा
श्रीनिवास वनगा शिवसेनेत गेला असला तरी त्याच्यासाठी आमचे दरवाजे कायम खुले आहेत. चिंतामण वनगा यांनी पालघरमध्ये भाजप रूजवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळं वनगांचं योगदान भाजप विसरणार नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours