10 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारां यांची प्रकृती स्थिर नसल्यानं त्यांनी आजचा नियोजित कोकणचा दौरा रद्द केला आहे. राष्ट्रवादीचे राजापूर मतदार संघ प्रमुख अजित यशवंतराव यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार येऊ शकत नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, आज शरद पवार कोकण दौऱ्यावर नाणारला भेट देण्यासाठी जाणार होते. पण त्यांनी प्रकृती बिघडल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
कोकणात एका कार्यक्रमानंतर ते स्थानिकांशी संवाद साधणार होते. रिफायनरी प्रकल्पाला विरोध का होतोय, स्थानिकांची नेमकी काय भूमिका काय आहे, हे पवार जाणून घेणार होते. पण दरम्यान त्यांना हा दौराच रद्द करण्यात आला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours