09 मे : आता सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांवर जर अत्याचार झाले तर त्यासाठी दाद मागता येणार आहे. राज्य महिला आयोगातर्फे सायबर समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही सायबर समिती अन्यायाला अळा घालण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
सोशल मीडियावर फोटो टाकल्यानंतर किंवा मतं मांडल्यानंतर अनेक महिलांना ट्रोल केलं जातं. त्यांच्या बोलण्यावर किंवा फोटोंवर अश्लील कमेंटसही केल्या जातात. सोशल मिडीयावर अनेकदा मुलींच्या फोटोंचा गैरवापर केला जातो. मुलींना आणि महिलांना ब्लॅकमेल केलं जातं.
या सगळ्याला आळा घालण्यासाठी सायबर क्राईमची मदत घेतली जातेय. पण सायबर क्राईमनंही या प्रकारांना आळा बसलेला नाही. म्हणूनच यासाठी आता महिला आयोगानं सायबर समितीची नेमणूक केलीये. या कमिटीत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 10 व्यक्तींचा समावेश आहे. यांच्या माध्यमातून एक रिपोर्ट तयार करून तो सरकारला पाठवला जाईल.
Post A Comment:
0 comments so far,add yours